Quantcast
Channel: Fitness tea - Feed
Viewing all articles
Browse latest Browse all 76

पोटदुखीवर गुणकारी ठरेल पुदिन्याचा चहा !

$
0
0
पोट बिघडल्यावर तुम्ही काय करता? एकतर गोळी घेता किंवा किचनमध्ये घरगुती उपाय शोधता. पोटात दुखत असल्यास किंवा अपचनामुळे त्रास होत असल्यास एक नैसर्गिक उपाय आहे. The journal in Prescrire International च्या अभ्यासात या उपायाची क्षमता सिद्ध झाली आहे. हिंग – लहान मुलांमधील पोटदुखी दूर करण्याचा रामबाण उपाय !
  • पोट खराब झाल्यावर पुदिन्याच्या चहाचा कसा फायदा होतो?
ग्रीन टी प्रमाणे पुदिन्याच्या चहाचे (पेपरमिंट टी) देखील अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.  फक्त पोट खराब झाल्यावर किंवा अपचन झाल्यावरच नाही तर ताप, दाताचे दुखणे, congestion वर देखील हा चहा उपयुक्त ठरतो. पुदिनाच्या चहामध्ये अँटिऑक्सिडेन्ट असतात. त्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात व अन्नपचनास मदत होते. तसंच त्यात अँटी इन्फ्लामेंट्री गुणधर्म असल्याने पोटदुखी, पोटांचे त्रास दूर होण्यास मदत होते. पुदिन्याच्या चहात असलेल्या volatile oils मुळे पित्ताशयाला चालना मिळते व पचनास मदत होते. तुळस, आलं व मध – अपचनाचा त्रास कमी करणारे घरगुती चाटण म्हणून पुदिनाचा चहा कपभर घेतल्यास शरीर शांत होते. पचन सुधारते आणि बिघडलेल्या पोटाला आराम मिळतो. २००८ मध्ये झालेल्या अभ्यासानुसार पुदिनाच्या चहात असलेल्या इसेन्शिअल ऑईल्स हे पोटदुखी कमी करण्यास परिणामकारक ठरतात. तसंच flatulence, diarrhoea आणि irritable bowel syndrome (IBS) यावर देखील हा चहा कोणताही दुष्परिणाम न करता गुणकारी ठरतो. गर्भारपणात पुदिन्याचा चहा पिणे हितकारी
  • पुदिन्याचा चहा घरी कसा बनवावा?
पोट बिघडल्यास पुदिन्याचा ताजा, गरम चहा प्या. त्यामुळे तुम्हाला आराम मिळेल. घरच्या घरी पुदिन्याचा चहा बनवण्यासाठी तुम्हाला पुदिन्याची पाने व पाणी याची आवश्यकता आहे. जाणून घ्या हा चहा कसा बनवायचा: . कपभर पाण्यात थोडी पुदिन्याची पाने घाला. २. ५ मिनिटे पाणी उकळवा. चहाचा रंग लाईट ब्राऊन होईपर्यंत थांबा. . त्यांनतर चहा गाळा आणि काही वेळ थंड होऊ द्या. ४. चहाचा स्वाद वाढवण्यासाठी त्यात तुम्ही चमचाभर मध किंवा अर्धा लिंबू पिळून घालू शकता.   नोट: हा फक्त घरगुती उपाय आहे. हे करून देखील त्रास कमी न झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. References: [1]  Herbal remedies for dyspepsia: peppermint seems effective. Prescrire Int. 2008. Jun;17(95):121-3. PubMed PMID: 18630390. Read this in English Translated By –Darshana Pawar छायाचित्र सौजन्य – Shutterstock

Viewing all articles
Browse latest Browse all 76

Trending Articles