भारतीय म्हणजे चहाप्रेमी. इथे अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेकांच्या दिवसाची सुरवातच चहा-कॉफी घेण्याने होते. सकाळी उठल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा काय करता? असा जर आपल्याला कोणी प्रश्न विचारला तर तुम्ही म्हणाल चहा किंवा कॉफी घेतो/घेते. ही सवय आपल्यापैकी अनेकांना आहे. सकाळी उठल्यावर चहा-कॉफी घेतल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होण्यास मदत होते का ?
सकाळी झोपेतून उठल्यावर चहा किंवा कॉफी घेतल्याशिवाय फ्रेश वाटत नाही. ही सवय चुकीची असल्याची जाणीव अनेकांना आहे. परंतु, चहा-कॉफी शिवाय चैन पडत नाही. रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी काहीही घेतल्यास आरोग्यावर सारखाच परिणाम होतो, हे खूप लोकांना माहीत नाही. या ’6′ कारणांसाठी आजपासून नक्की प्या ‘ग्रीन टी’
चहा, कॉफी वेगवेगळ्या स्वरूपात, स्वादात मिळतात. आजकाल तर त्यात बरेच प्रकार उपलब्ध आहेत. चहा-कॉफीचे प्रमाणात सेवन केल्यास आरोग्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. पण त्याचा अतिरेक आरोग्य बिघडवेल. पोटदुखीवर गुणकारी ठरेल पुदिन्याचा चहा !
कॉफी किंवा चहा घेण्यापूर्वी ग्लासभर पाणी प्यावे, याची अनेकांना कल्पना नाही. सकाळी किंवा संध्याकाळी, चहा किंवा कॉफी घेण्याआधी थोडं पाणी अवश्य प्या, असे मुंबईचे न्यूट्रीशियनिस्ट आणि लाईफस्टाईल कोच Dr. Tejender Kaur Sarna, यांनी सांगितले. मसाला चहा अथवा ग्रीन टी या पैकी कोणता पर्याय निवडाल?
चहा किंवा कॉफी घेण्यापूर्वी पाणी का प्यावे?
चहा किंवा कॉफी घेण्यापूर्वी पाणी पिण्यामागचे कारण म्हणजे त्यामुळे पोटातील अॅसिडिटी कमी होते. चहा सुमारे ६ ph म्हणजे अॅसिडिक असतो आणि कॉफी ५ ph म्हणजे अॅसिडिक रेंज थोडीसी कमी आहे. किती कप चहा पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ?
म्हणून तुम्ही जेव्हा सकाळी किंवा संध्याकाळी चहा किंवा कॉफी घेता तेव्हा अॅसिडिटी वाढते. तसंच अल्सर्स आणि कॅन्सरच्या धोक्याची काहीशी शक्यता असते. जर तुम्ही चहा किंवा कॉफी घेण्याआधी पाणी प्यायलात तर पोटातील अॅसिडची पातळी काहीशी सौम्य होते आणि पोटाच्या व इतर आरोग्याची हानी कमी होते. त्याचबरोबर चहाच्या अधिक अॅसिडिक स्वरूपामुळे दातांवर होणारा दुष्परिणाम कमी होतो. पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि शरीरातून टॉक्सिन्स निघून जाण्यास मदत होते. ‘कॉफी’चे वेड तुम्हांला दीर्घायुषी बनवेल !
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
↧