Quantcast
Channel: Fitness tea - Feed
Viewing all articles
Browse latest Browse all 76

ग्रीन टी चे अतिरिक्त प्रमाण शरीरास हानिकारक ठरते का ?

$
0
0
तुम्ही रोज न चुकता ग्रीन टी घेता का ? आणि का घेऊ नये? अनेक अभ्यासातून असे सिद्ध झाले आहे की, ग्रीन टी मध्ये असलेल्या catechins मुळे अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. परंतु, ग्रीन टी चा अतिरेक करणे कितपत योग्य आहे? ग्रीन टी च्या अतिरिक्त प्रमाणामुळे शरीरावर काही दुष्परिणाम होतात. या ’6′ कारणांसाठी आजपासून नक्की प्या ‘ग्रीन टी’
  • खूप ग्रीन टी घेतल्याने काय होईल ?
The International Journal of Clinical and Experimental Medicine च्या अहवालानुसार असे दिसून आले आहे की, ग्रीन टी खूप प्रमाणात घेतल्याने लिव्हरचे कार्य सुरळीत होण्यास अडथळे येतात. त्यामुळे इन्फेकशन होण्याची शक्यता असते. ग्रीन टी मध्ये असलेल्या tannins मुळे शरीरात आयर्नचे शोषण होण्यास प्रतिबंध होतो, असे the American Journal of Clinical Nutrition च्या अभ्यासातून सिद्ध झाले आहे. याचा अर्थ तुमचे शरीर भाज्या, दूध, दुग्धजन्य पदार्थ यातून कमी प्रमाणात आयर्न शोषून घेते. तसंच ग्रीन टी च्या अधिक सेवनामुळे मांसाहारी पदार्थातून आयर्न शोषून घेण्याच्या प्रक्रीयेवर देखील परिणाम होतो. ‘ग्रीन टी’मुळे शरीराला या ’6′ आजारांचा धोका ! ऑटोइम्म्युनी आजार असल्यास दिवसातून १-२ कप ग्रीन टी घेण्यास काही हरकत नाही. ग्रीन टी मुळे इम्म्युनिटी सिस्टिमला चालना मिळते. परंतु, BMC Complementary and Alternative Medicine च्या अभ्यासानुसार जर तुम्हाला कोणता आजार असल्यास ग्रीन टी चा दुष्परिणाम देखील होऊ शकतो. मसाला चहा अथवा ग्रीन टी या पैकी कोणता पर्याय निवडाल?
  • दिवसभरात किती ग्रीन टी घेणे योग्य ठरेल ?
ग्रीन टी चे जसे आरोग्यदायी फायदे आहेत. तसेच दुष्परिणाम देखील आहेत. परंतु, दिवसातून तीन कप ग्रीन टी घेणे योग्य ठरेल. वजन कमी करण्यासाठी तीन कप ग्रीन टी घेणे पुरेसे आहे. तसंच त्यामुळे शरीरात आयर्नचे शोषण होण्यास अडथळा देखील येत नाही, असे न्यूट्रीशियनिस्ट Prema Kodical यांनी सांगितले. वजन घटवण्यासाठी किती आणि कसा प्याल ‘ग्रीन टी’ टीप: रिकाम्या पोटी ग्रीन टी घेतल्यास शरीरात अँटिऑक्सिडंट्सचे शोषण होण्यास मदत होते. Read this in English Translated By –Darshana Pawar छायाचित्र सौजन्य – Shutterstock References: [1] Yin, X., Yang, J., Li, T., Song, L., Han, T., Yang, M., … Zhong, X. (2015). The effect of green tea intake on risk of liver disease: a meta-analysis. International Journal of Clinical and Experimental Medicine, 8(6), 8339–8346. [2] Samman S, Sandström B, Toft MB, Bukhave K, Jensen M, Sørensen SS, Hansen M. Green tea or rosemary extract added to foods reduces nonheme-iron absorption. Am  J Clin Nutr. 2001 Mar;73(3):607-12. PubMed PMID: 11237939. [3]Saleh, F., Raghupathy, R., Asfar, S., Oteifa, M., & Al-Saleh, N. (2014). Analysis of the effect of the active compound of green tea (EGCG) on the proliferation of peripheral blood mononuclear cells. BMC Complementary and Alternative Medicine, 14, 322. http://doi.org/10.1186/1472-6882-14-322.  

Viewing all articles
Browse latest Browse all 76

Trending Articles