Quantcast
Channel: Fitness tea - Feed
Viewing all articles
Browse latest Browse all 76

जेवणानंतर झोप टाळण्यासाठी चहा पिणं फायदेशीर आहे का ?

$
0
0
जेवणानंतर अनेकदा झोप येते. आणि यावर उपाय म्हणून अनेकजण ऑफिमध्ये असताना चहा, कॉफीची मदत घेतात. काही अभ्यासानुसार, चहा  घेतल्याने पचन सुधारण्यास मदत होते मात्र त्यामधील कॅफिन घटक अन्नपदार्थांमधील पोषकद्रव्य शोषून घेण्याची क्षमता कमी करतात. त्याचा परिणाम कळत-नकळत आरोग्यावर होतो. जेवणानंतर या '6' गोष्टी तात्काळ करूच नका !
  • चहाचा पचनकार्यावर कशाप्रकारे परिणाम होतो ?
जेवताना किंवा जेवल्यानंतर चहा प्यायल्यास पोटफुगीचा त्रास आणि पोटातील गॅस कमी होतो. असे काही अभ्यासामधून स्पष्ट झाले आहे. पण म्हणून प्रत्येक प्रकारचा चहा आरोग्यासाठी फायदेशीर असतो हा तुमचा समज असेल तर तो बदलणं गरजेचे आहे. ग्रीन टी किंवा हर्बल टी यामध्ये अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक मुबलक असतात.सोबतच यामधील polyphenols घटक पचन सुधारण्यास मदत करतात.मसाला चहा अथवा ग्रीन टी या पैकी कोणता पर्याय निवडाल?
  • जेवणासोबत चहाचा आस्वाद का घेऊ नये ?
काही अभ्यासानुसार, चहामधील phenolic घटक पोटात iron-complexes निर्माण करतात. यामुळे अन्न पदार्थातील आयर्न शोषून घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे आयर्न आणि व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ मुबलक प्रमाणात खावेत. म्हणजे तुमची जेवणानंतर लगेजच चहा  पिण्याची सवय आरोग्याला त्रासदायक ठरणार नाही तसेच अन्नपदार्थांमधून आयर्न शोषून घेण्याची क्षमता खालावल्याने आरोग्यावर परिणाम होणार नाही. प्रामुख्याने ज्या व्यक्तींमध्ये आयर्नची कमतरता आहे. त्यांनी ताबडतोब चहा पिणं टाळावे. जेवणानंतर चहा पिण्याची सवय आरोग्याला त्रासदायक ठरू शकते. चहातील tannins घटक तसेच catechins घटक याचा आरोग्यावर परिणाम होतो.   चहा, कॉफी पिण्याआधी पाणी का प्यावे ? हेेदेखील नक्की जाणून घ्या . जेवणानंतर येणारी झोप आटोक्यात ठेवण्यासाठी तुम्ही चहाचा विचार करत असाल तर तो टाळा आणि चहाची तलफ आल्यास ग्रीन टी किंवा आल्याचा चहा निवडा. म्हणजे पचन सुधारायला मदत होईल. आयर्नची कमतरता असणार्‍यांनी जेवणानंतर कटाक्षाने चहा टाळावा. तसेच आयर्न कमतरतेमधून अधिक गुंतागुंतीचे त्रास वाढू नये म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानेच योग्य निर्णय घ्यावा. या ’6′ कारणांसाठी आजपासून नक्की प्या ‘ग्रीन टी’ ऑफिसमध्ये तुम्हांला दुपारच्या वेळेस झोप येत असल्यास चहा, कॉफी घेण्याऐवजी ऑफिसमध्ये दुपारच्या वेळेस येणारी झोप दूर करण्याचे '६' सोपे उपाय ! आजमावून पहा. Read this in English Translated By – Dipali Nevarekar छायाचित्र सौजन्य – Shutterstock References:
  1. Siro I. Trevisanato et al – Tea and Health
  2. Green Tea – University of Maryland Medical Center
  3. Christiane J. Dufresne et al – A review of latest research findings on the health promotion properties of tea
  4. Rodney J. Green – Common tea formulations modulate in vitro digestive recovery of green tea catechins
  5. Inhibition of non-haem iron absorption in man by polyphenolic-containing beverages

Viewing all articles
Browse latest Browse all 76

Trending Articles