जास्वंदीचे लाल फुल समोर येताच आपल्याला गणपती बाप्पाची आठवण होते. या फुलाशी जसे आध्यात्मिक नाते आहे तसेच त्याचे आरोग्यदायी फायदे देखील आहेत. गणपतीला जास्वंद वाहिल्याने आपली सगळी विघ्न दूर होतात आणि बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतो, अशी आपली श्रद्धा आहे. त्याचबरोबर जास्वंदीचा चहा घेतल्याने तुम्हाला प्रसन्न वाटेल व त्यातून अनेक आरोग्यदायी फायदे मिळतील. कारण अभ्यासातून असे सिद्ध झाले आहे की जास्वंदीचे फुल हे रक्तदाबाचा त्रास कमी करण्यास मदत करते. हायपरटेंशनचे शरीरावर हे १० दुष्परिणाम होतात
अभ्यासावरून असे दिसून आले रक्तदाबाच्या औषधांपेक्षा म्हणजेच lisinopril आणि hydrochlorothiazide च्या तुलनेत जास्वंद अधिक प्रभावशाली आहे. संशोधकांनुसार anthocyanins मुळे फुलाला लाल रंग प्राप्त होतो व त्यामुळेच रक्तदाब कमी होण्यास मदत होते. हायपरटेंशनचा त्रास आटोक्यात ठेवायला मदत करतील ही १० फळं आणि भाज्या
एका संशोधनात hydrochlorothiazide आणि जास्वंदाच्या फुलाची क्षमता तपासण्यात आली. त्यातून असे सिद्ध झाले की जास्वंदीचे फुल हे औषधापेक्षा अधिक परिणामकारक आहे. आणि त्यामुळे electrolyte imbalance देखील होत नाही. तसंच जास्वंदीच्या फुलाचा परिणाम हा hydrochlorothiazide पेक्षा दीर्घ काळापर्यंत राहतो. उच्च रक्तदाबासंबंधीचे हे ’10′ गैरसमज आजच दूर करा
जास्वंदीचा चहा कसा बनवाल ?
जास्वंदीच्या लालचुटूक पाकळ्या या उच्च रक्तदाबावर अतिशय फायदेशीर असतात. तसंच त्याचे काही दुष्परिणाम देखील नसतात. ऑनलाईन तुमची याचे पॅक विकत घेऊ शकता किंवा अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी देखील बनवू शकता. जाणून घेऊया जास्वंदीचा चहा बनवण्याची पद्धत.
साहीत्य:
कृती:
एका भांड्यात पाणी गरम करा. त्यात लवंग आणि दालचिनीची काडी टाका. पाणी उकळेपर्यंत थांबा. पाणी उकळ्यावर त्यात जास्वंदीच्या फुलाच्या पाकळ्या घाला आणि पाणी पूर्ण उकाळ्यानंतर गॅस बंद करा. मग भांड्यावर झाकण ठेवा आणि चहा थोडा थंड होऊ द्या. हा चहा तुम्ही गरमागरम पिऊ शकता किंवा त्यात बर्फ आणि मध घालून घेऊ शकता. मध चहा गरम असताना घालू नका. चहाच्या लालसर रंगानेच तुम्हाला प्रसन्न वाटेल.
References:
1. Nwachukwu DC, Aneke EI, Obika LF, Nwachukwu NZ. Effects of aqueous extract of Hibiscus sabdariffa on the renin-angiotensin-aldosterone system of Nigerians with mild to moderate essential hypertension: A comparative study with lisinopril. Indian J Pharmacol. 2015 Sep-Oct;47(5):540-5. doi: 10.4103/0253-7613.165194. PubMed PMID: 26600645; PubMed Central PMCID: PMC4621677.
2. Nwachukwu DC, Aneke E, Nwachukwu NZ, Obika LF, Nwagha UI, Eze AA. Effect of Hibiscus sabdariffaon blood pressure and electrolyte profile of mild to moderate hypertensive Nigerians: A comparative study with hydrochlorothiazide. Niger J Clin Pract. 2015 Nov-Dec;18(6):762-70. doi: 10.4103/1119-3077.163278. PubMed PMID: 26289514.
Read this in English
Translated By –Darshana Pawar
छायाचित्र सौजन्य – Shutterstock
↧