दिवसाची सुरवात फ्रेश करण्यासाठी तुमचे पोट नीट साफ होणे गरजेचे आहे. बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. म्हणजेच सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिणे किंवा चहा-कॉफी घेणे. त्यामुळे पोट साफ होण्याची क्रिया सुरळीत होईल, असे अनेकांना वाटते.
पाणी पिणे हा सुरक्षित आणि हेल्दी पर्याय असला तरी बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी चहा-कॉफी पिणे हा उपाय कितीपण योग्य आहे, हा प्रश्नच आहे. या पेयांमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास अधिक बिकट होईल. ज्यांना हा त्रास फार गंभीर स्वरूपात आहे त्यांना तर चहा-कॉफीमुळे अधिक त्रास होईल. जसलोक हॉस्पिटल आणि रिसर्च सेन्टरचे consultant- hepatologist, gastroenterologist आणि therapeutic endoscopist, डॉ. जयश्री शहा यांनी यावर स्वविस्तर माहिती दिली.
सकाळच्या वेळेस पोट साफ होणे गरजेचे आहे. दिवसभरात १-२ कप कॉफी घेण्यास काही हरकत नाही. त्यामुळे bowel motility ला चालना मिळते. परंतु, सकाळच्या वेळेस सगळ्यात आधी चहा-कॉफी घेणे योग्य नाही. बद्धकोष्ठतेच्या त्रासावर ते परिणामकारक ठरणार नाही. तसंच हे प्रत्येकाच्या जीवनशैलीवर अवलंबून आहे, असे डॉक्टर म्हणाल्या. जुनाट बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी घरगुती उपाय
सकाळच्या चहा-कॉफीने तुमचा बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होण्यास मदत झाली तरी दिवसभरात ६-७ कप किंवा त्याहून अधिक चहा-कॉफी घेतल्यास त्याने दुष्परिणाम होतील. चहा आणि कॉफी हे लघवीचे प्रमाण वाढवणारे पदार्थ असल्याने दिवसभरात अधिक वेळा लघवीला जावे लागेल व त्यामुळे डिहायड्रेशन येईल. परिणामी शौच साफ होण्यास अडथळे निर्माण होतील, असे डॉक्टरांनी सांगितले. या ‘बीयांचे’ मिश्रण झटपट हटवेल बद्धकोष्ठतेचा त्रास !
अशावेळी काय करावे?
जीवनशैली आणि आहाराच्या सवयी याचा परिणाम बद्धकोष्ठतेवर होतो. डॉ. शहा यांनी बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी काही टीप्स दिल्या.
- वेळेवर जेव्हा आणि आहारात फायबरचे प्रमाण वाढावा: कार्ब्सयुक्त आहार घेतल्याने bowel movements कमी प्रमाणात होते. त्याऐवजी फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. फळे, सलाड खाल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत होईल. योग्य वेळी योग्य अन्नपदार्थ खाणे, हा बद्धकोष्ठतेचा त्रास दूर करण्याचा उत्तम उपाय आहे. बद्धकोष्ठतेवर काही घरगुती उपाय
- भरपूर पाणी प्या: आपल्यासारख्या उष्ण हवामानात दिवसभरात २-३ लिटर पाणी पिणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुम्ही हायड्रेट रहाल व बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होईल. कोणत्या टप्प्यावर बद्धकोष्ठतेच्या त्रासासाठी उपचार सुरू करणे गरजेचे ठरते ?